नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखात राजर्षी शाहू महाराज (shahu maharaj information in marathi) यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत. तुम्ही या लेखाचा उपयोग शाहू महाराजांबद्दल भाषणात(Shahu maharaj speech in marathi) किंवा निबंध लिहण्यास (rajarshi shahu maharaj nibandh in marathi/ rajarshi shahu maharaj information in marathi) सुद्धा करू शकतात.
२० व्या शतकामध्ये स्वराज्याचा खरा वारसा पुढे आणून महाराष्ट्राच्या वैचारिक जडणघडनीला मोलाचे योगदान देणारा दूरदृष्टीचा राजा म्हणजे राजर्षी शाहू महाराज.छत्रपती शिवाजी महराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे पुढे चार भागात विभाजन झाले त्यापैकीच एक कोल्हापूर संस्थान.या संस्थानाची राजर्षी शाहू महराजांनी १८९४ ते १९२२ या कालखंडात गादि सांभाळली.
2६ जून, आरक्षण देणारा पहिला राजा..
जे पालक आपल्या मुलांना शाळेत घालणार नाहीत त्यांना १ रु, दंड ठोकणारा राजा..
कला संस्कृती, क्रीडा, शिक्षण यांना राजाश्रय देणारा राजा..
अंधश्रद्धा, कर्मकांडे, दैववाद यावर प्रहार करणारा राजा..
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घरी जाऊन सन्मान करणारा राजा..
सर्व क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणारा राजा..
राजर्षी शाहू महाराज…
जन्म | 26 जून 1874 |
जन्म ठिकाण | कागल, कोल्हापूर जिल्हा, मध्य प्रांत (सध्या महाराष्ट्र) |
पालक | जयसिंगराव आप्पासाहेब घाटगे (वडील) आणि राधाबाई (आई); आनंदीबाई (दत्तक आई) |
जोडीदार | लक्ष्मीबाई |
मुले | राजाराम तिसरा, राधाबाई, श्रीमन महाराजकुमार शिवाजी आणि श्रीमती राजकुमारी औबाई |
शिक्षण | राजकुमार कॉलेज, राजकोट |
धार्मिक दृश्ये | हिंदू धर्म |
वारसा | सामाजिक आणि शैक्षणिक सुधारणा, ब्राह्मण वर्चस्वाला विरोध |
मृत्यू | 6 मे 1922 |
मृत्यूचे ठिकाण | कोल्हापूर, महाराष्ट्र |
जन्म: Shahu Maharaj Birth
26 जून 1874 रोजी कोल्हापूर येथील कागलच्या प्रसिद्ध घाटगे घराण्यात त्यांचा जन्म झाला.त्यांचे मुळनाव यशवंतराव जयसिंगराव घाटगे हे होते.शाहू महाराज यांच्या आईचे नाव राधाबाई असे होते.
पुढे कोल्हापूर संस्थांनचे महराज चौथे शिवाजी यांचे निधन झाल्या नंतर 17 मार्च 1884 रोजी शाहू महराज यांचे कोल्हापूर राजघराण्यात दत्तक विधान झाले.
शिक्षण आणि प्रवास : Shahu Maharaj Education
राजकोट याठीकांणचे राजकुमार कॉलेज हे तत्कालीन राजघराण्यातील वंशजांचे तसेच अनेक उच्चपदस्थांच्या मुलांना शिक्षण देणारे कॉलेज होते. दत्तक विधानानंतर शाहू महाराज यांना राजकोटच्या राजकुमार कॉलेजमध्ये शिक्षणासाठी पाठवण्यात आलं. राजकुमार हायस्कुलमध्ये शाहू महाराजांबरोबर त्यांचे बंधू तसेच कोल्हापुरातील काही उच्चपदस्थ घराण्यांतील मुले होती. महाराजांच्या हृदयात आणि मनावर इंग्रजी शिक्षकांचा आणि इंग्रजी शिक्षणाचा प्रभाव खोलवर होता. ते वैज्ञानिक विचारांवर ठाम विश्वास ठेवणारे होते आणि त्यांना चालना देण्याच्या मार्गावर ते गेले. जुन्या चालीरीती, परंपरा किंवा काल्पनिक गोष्टींबद्दल ते बेफिकीर होते.
शाहू महाराजांनी संपूर्ण दक्षिण आणि उत्तर भारतात भ्रमंती केली. अगदी कोलंबोपर्यंत जाऊन त्यांनी संपूर्ण प्रदेशाची माहिती घेतली.याबरोबरच त्यांनी वायव्य भारत आणि पश्चिमेस कराची-पेशावरपर्यंत प्रवास केला होता. त्यानंतर उत्तर भारत, आजच्या राजस्थानातील संस्थांनांनाही भेट देऊन तेथिल राजकीय, भौगोलिक स्थितीचा आढावा घेतला होता. पुढील आयुष्यातही त्यांचा परदेशाबरोबर दिल्ली, अलाहाबाद, कानपूर आणि मुंबईला अनेकवेळा प्रवास घडला. अभ्यासाबरोबरच व्यायाम, खेळ, घोडेस्वारी अशा बाबतीत शाहू महाराज विशेष आघाडीवर होते.विविध प्रकारचे प्राणी जोपासणं, हत्ती-चित्ते यांची जोपासना, शिकार, कुस्ती यावर त्यांचं विशेष प्रेम होतं. अनेक संस्थांनांमधून विविध प्रकारचे प्राणी त्यांनी कोल्हापुरात आणले होते तसेच अनेक संस्थानिकांना आपल्याकडील प्राणी भेटासाठी पाठवलेही होते. कुस्तीची मैदानं भरवून कुस्तीचा आनंद ते घेत असत. साठमारी, चित्त्यांकडून शिकार, डुकरांची शिकार करणं असे तत्कालीन क्रीडाप्रकार त्यांना आवडत असत.२ एप्रिल 1894 रोजी त्यांच्याकडे कोल्हापूरच्या राज्यकारभाराची सूत्रं आली.
विवाह : Shahu Maharaj Marriage
शाहू महाराज यांचा विवाह बडोद्याचे सरदार खानविलकर यांच्या कन्या लक्ष्मीबाई यांच्याशी 1891 साली झाला.
शाहू मह्राराजाचे कार्य: Shahu Maharaj Works
ब्रिटीश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी या काळात शाहू राजांनी प्रयत्न केले,सामजिक परिवर्तन आणि लोकांच्या मानसिकतेचे पुर्नवसन करण्याचे कार्य महाराजांनी आयुष्यभर केले.महाराजांच्या कार्याचा गौरव कुर्बी समाजाने राजर्षी हि पदवी देऊन केला.
शेती : Shahu Maharaj on Agriculture
- शाहू महाराजांनी सत्तेवर येताच सर्वात आधी संस्थानातल्या सर्व तालुक्यांना भेट दिली.
- कोल्हापुरातील शेतकऱ्याच्या समस्यांचा अभ्यास करून संस्थातील पाझर तलावाच्या डागडुजिचा व नवीन पाण्याचे स्त्रोत निर्माण करण्याचा आदेश काढला .सततच्या दुष्काळी स्थितीवर मत करण्यासाठीचा हा दूरदृष्टीचा निर्णय होता.
- पन्हाळ्याला गेल्यावर त्यांनी पन्हाळ्याला रबर,चहा,कॉफीची लागवड केली.कोल्हापुरातून नवीन चहाचा ब्रान्ड तयार केला.त्याचप्रमाणे भुदरगड भागातही चहाची लागवड सुरू झाली.नवीन रोपाचे वान तयार करण्याला प्रोत्साहन दिले.
- आज महाराष्ट्रात उस उत्पादनात अग्रेसर आहे त्याचे श्रेय शाहू महाराजांना जाते.कोल्हापूरला ऊसाच्या उत्पादनामुळे भरपूर गुळ तयार होत असला तरी तिला बाजारपेठेचं स्वरुप आलं नव्हतं. त्यामुळे त्यांनी कोल्हापूर शहरात शाहूपुरी ही व्यापारी पेठ सुरू केली आणि ते एक गुळाचं केंद्र तयार झालं.त्या बरोबरच “शाहू छत्रपती स्पिनिंग अंड विव्हिंग मिल” शाहू व्यापारपेठ,शेतकऱ्याचीसहकारी संस्था,शेतकी तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी “किंग एडवर्ड अग्रीकल्चरल इस्टीटूट” इत्यादी संस्था कोल्हापुरात स्थापन केल्या.राधानगरी धरणाची उभारणी,शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देणे इत्यादी उपक्रमातुनहि त्यांनी कृषी विकासाकडे लक्ष दिले.
- कोल्हापूर संस्थानाला शाहू महाराजांच्या काळात प्लेग तसेच अनेकवेळा दुष्काळाला तोंड द्यावे लागले मात्र शाहू महाराज या संकटाच्या काळात स्वतः पाहणी करुन परिस्थिती नियंत्रणात आणत होते.याच काळात त्यांनी लोकांच्या औषधोपचाराची सोय केली. स्वस्तात धान्य उपलब्ध करुन दिलं.अनाथालयं सुरू केली आणि मुलांच्या पालनाची सोय केली. प्लेग तसेच इतर साथीच्या काळामध्ये गावागावांतील स्वच्छतेसाठी ते प्रयत्न करत होते.
वेदोक्त प्रकरण:
वेदोक्त प्रकरण महाराजांच्या जीवनाला कलाटणी देणारे ठरले.असे प्रकरण काही महाराष्ट्रला नवीन नव्हते.यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळीही असा वाद निर्माण झाला होता. शिवाजी महाराजांनी काशीहून गागाभट्टांना बोलावून राज्याभिषेक करवून घेतला होता.
साताऱ्याचे महाराज प्रतापसिंह यांच्या कार्यकाळातही वेदोक्ताधिकाराचा तंटा निर्माण झाल्यावर त्यांनी पंडितांची एक निर्णयसभा बोलावली आणि त्यामध्ये मराठ्यांचे क्षत्रियत्व सिद्ध होऊन त्यांना वेदोक्ताचा अधिकार मान्य केला गेला.
1896 साली बडोद्यात सयाजीराव गायकवाड यांच्याकडील धार्मिक विधी महाराष्ट्रीय ब्राह्मणांनी वेदोक्त पद्धतीने करण्यास नकार दिल्यावर सयाजीरावांनी राजस्थानी आणि गुजराती ब्राह्मणांकरवी ते करवून घेतले होते.
हाच प्रकार शाहू महाराजासोबातही झाला.1899 साली हे प्रकरण कोल्हापूरामध्ये घडले. कार्तिक महिन्यात शाहू महाराज पंचगंगा नदीवर स्नानासाठी जात असत. यावेळेस त्यांच्या परिवारातले काही सदस्य बंधू बापूसाहेब महाराज, मेहुणे मामासाहेब खानविलकर आणि स्नानाच्यावेळेस मंत्र म्हणणारे नारायण भटजी असत.
एकेदिवशी महाराजांचे स्नेही आणि प्रकांड पंडित राजारामशास्त्री भागवतही होते. महाराजांचे स्नान सुरू असताना भटजी म्हणत असलेले मंत्र वेदोक्त नसून पुराणोक्त असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.
त्यांनी हे महाराजांच्या लक्षात आणून दिलं. महाराजांनी भटजींना विचारताच त्यांनी शूद्रांना पुराणोक्त मंत्रच सांगावे लागतात असं उत्तर दिलं. .वेदोक्त प्रकरणाचे पडसाद कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात न पडते तरच नवल. यातून एकप्रकारचा संघर्षच निर्माण झाले. महाराष्ट्रातील तत्कालीन वर्तमानपत्रांतून, सभा-भाषणांतून त्याची दोन्ही बाजूंनी चर्चा होऊ लागली.
हे उत्तर शाहू महाराजांसाठी एक मोठ्या विचारमंथनाचं कारण ठरलं. त्या वाक्यानं ते अंतर्मूख तर झालेच त्याहून पुढील मोठ्या सामाजिक चळवळीसाठी सिद्ध झाले.राजाला जर अशी वागणूक मिळत असेल तर सामान्य प्रजाजनाची काय अवस्था असेल.यातून त्यांनी समाज परिवर्तनाचा ध्यास घेतला.
टिळक आणि शाहू महाराज :
एक्या काळी कोल्हापूर संस्थानाबद्दल आपुलकी दाखवणारे लेख टिळकांनी केसरीमध्ये लिहिले होते पण वेदोक्त प्रकारानावेली मात्र टिळकांनी ब्राह्मणाची बाजू घेतली.
ऑक्टोबर 1901 मध्ये लोकमान्य टिळकांनी आपल्या केसरीमध्ये वेदोक्ताचे खूळ या नावाचे दोन अग्रलेख लिहिले. त्यातून त्यांनी वेदोक्तातील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ती थोडक्यात अशी होती, “या युगात ब्राह्मण व शूद्र असे दोनच वर्ण राहिले आहेत. शिवाजी महाराजांच्या कार्यावर मोहिती होऊन तत्कालीन कर्त्या पुरुषांनी खास सवलत म्हणून त्यांना क्षत्रियत्व बहाल करुन गागाभट्टाच्या हस्ते वेदोक्त पद्धतीने राज्याभिषेक केला; पण त्यावेळी भोसले घराण्याची सर्व धर्मकृत्ये पुराणोक्तच करावीत अशी परंपरा ब्राह्मणांनी घालून दिली होती. हीच परंपरा पाळली गेली पाहिजे. छत्रपती घराण्याशिवाय अन्य मराठे क्षत्रिय नाहीत. सबब त्यांना वेदोक्ताचा अधिकार नाही.”
तरी परंतु शाहू महराजांनी छत्रपतींच्या भोसले घराण्याशिवाय वेदोक्ताचा समस्त मराठ्यांना हा अधिकार मिळावा असा आग्रह धरला आणि तसेही प्रयत्नही केले.पुढे जाऊन राजर्षी शाहू महाराजांनी ब्राह्मणेतर जातीतींल मुलांना वेद शिकण्याचा अधिकार मिळावा यासाठी थेट वैदिक स्कूल काढूनच आपल्या कृतीतून उत्तर दिले.ज्या ब्राह्मणांनी वेदोक्त पद्धतीने विधी करण्यास नकार दिला त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली.
संस्थानचे राजोपाध्यांचे राजसेवेसाठी दिलेले 30 हजारांचे इनाम जप्त करण्यात आले. करवीरच्या शंकराचार्य मठाचे ब्रह्मनाळकर स्वामी यांचे 50 हजार रुपयांचे उत्पन्न सरकारजमा करण्यात आले. इतरही शेकडो ब्राह्मणांची उत्पन्नं आणि इनाम सरकारजमा करण्यात आले.हे प्रकरण कोलकात्याच्या गव्हर्नर जनरलपर्यंतही गेले. वेदोक्ताचा अधिकार कोणाला द्यायचा यावर चर्चा, टीका घडत राहिली. 1905 साली डिसेंबर महिन्यामध्ये जाहीर सभेतील ठरावात महाराजांचे क्षत्रियत्व आणि त्यांना वेदाधिकार असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर हे प्रकरण निवळले.
शिक्षण कार्य: Shahu Maharaj on Education
राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनामध्ये त्यांनी जेवढे महत्व शिक्षणाला दिले तेवढे दुसर्या कोण्या घटकाला दिले नाही.. सर्व जातींच्या मुलांना, मुलींना शिक्षण घेता यावे यासाठी त्यांनी कोल्हापुरात जातीनुरुप वसतीगृहे काढली.
- 1901 सालीच त्यांनी व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगची स्थापना केली. त्यानंतर त्याच्या पुढच्याचवर्षी त्यांनी मागास जाती-जमातीतल्या लोकांसाठी सरकारी नोकरीमध्ये निम्म्या जागा राखीव ठेवण्याचा आदेश काढला. शंभर वर्षांपुर्वी असा क्रांतिकारक निर्णय घेणं मोठं धा़डसाचं आणि आश्चर्याचं काम होतं.
- 1906 साली त्यांनी किंग एडवर्ड मोहमेडन एज्युकेशन सोसायटीही मुसलमानांच्या शिक्षणासाठी शैक्षणिक संस्था सुरू केली आणि तिचे ते अध्यक्षही झाले.
- 1908 साली त्यांनी अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या जातीतील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह स्थापन केले. अशाप्रकारे अनेक जातीनिहाय संस्था कोल्हापुरात स्थापन झाल्या. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या विद्यार्थ्यांची फी माफ करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता.मागास जातीतील विद्यार्थ्यांनाही फी माफ करण्याचा निर्णय शाहू महाराजांनी लागू केला होता. पाटीलचे शिक्षण देण्यासाठी त्यांनी दिल्ली दरबार मेमोरियल पाटील स्कूल ही शाळा स्थापन केली होती.
- 1912 साली धार्मिक विधींचे प्रशिक्षण देण्यासाठी सत्यशोधक शाळा सुरू करण्यात आली. याबरोबरच देशातील अनेक संस्थांना, वसतीगृहांना, मुलांना त्यांनी मदत आणि देणगी दिलेली होती.संस्थानामध्ये मोडी लिपीऐवजी बाळबोधचा वापर करण्याचा त्यांनी आदेश काढला होता. अनेक साहित्य, नाट्यसंस्थांना देणग्या-पालकत्व देण्याचं काम त्यांनी केलं होतं.अनेक लेखकांना ग्रंथनिर्मितीसाठी, संशोधनासाठी त्यांनी मदतीचा हात दिला.करण्यासाठी त्यांना मुंबईत जावं लागे.सुरुवातीच्या काळात ते मुंबईतील सरदारगृह या इमारतीमध्ये उतरत असत.या इमारतीत अनेक संस्थानिक, राजकीय नेते, उच्चपदस्थ मुंबईत आल्यावर मुक्काम करत असत. लोकमान्य टिळकही याच इमारतीत राहात असत. त्याच इमारतीमध्ये उतरत. सरदारगृहातच लोकमान्य टिळकांचे 1920 साली निधन झाले होते.
आरक्षण : Shahu Maharaj on Reservation
शाहू महाराज १९०२ च्या मध्यात इंग्लंडला गेले. त्यानंतर त्यांनी कोल्हापुरातील ५०% प्रशासकीय पदे मागासवर्गीयांसाठी राखीव ठेवण्याचा आदेश जारी केला. महाराजांच्या आज्ञेमुळे कोल्हापूरच्या ब्राह्मणांना शाप मिळाला. शाहू महाराजांनी १८९४ मध्ये राज्याची सूत्रे हाती घेतली तेव्हा कोल्हापूरच्या सामान्य प्रशासनातील एकूण ७१ पदांपैकी ६०जागांवर ब्राह्मण अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्याचप्रमाणे ५०० कारकुनी पदांपैकी फक्त दहा ब्राह्मणेतरांकडे होत्या. शाहू महाराजांनी मागासलेल्या जातींना दिलेल्या संधींमुळे १९१२ मध्ये ब्राह्मण अधिकार्यांची संख्या ३५ पर्यंत कमी झाली. शाहू महाराजांनी १९०३ मध्ये कोल्हापुरातील शंकराचार्य मठाची मालमत्ता जप्त करण्याचा आदेश दिला.
दलित व दिनदुब्ल्यांसाठी कार्य:
दलितांची परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांनी अशा दोन युगप्रवर्तक प्रथा बंद केल्या. कुटुंबातील सदस्यांना संपूर्ण गावासाठी मोफत सेवा देण्याची सक्ती करण्यात आली. त्याचप्रमाणे, १९१८ मध्ये त्यांनी ‘वतनदारी’ नावाची दुसरी जुनी सरकारी संस्था रद्द करण्याचा हुकूम काढला आणि जमीन सुधारणा लागू करून, त्यांनी महारांना जमीन मालक बनण्याची परवानगी दिली. या निर्णयामुळे महारांची आर्थिक गुलामगिरी मोठ्या प्रमाणात उठवण्यात आली. गुलामगिरीतून मुक्त करेल. सत्तेच्या स्त्रोतांपासून वगळलेल्या समाजातील घटकांच्या हितासाठी त्यांनी अनेक कामे केली असली तरी, त्यांनी केलेल्या आरक्षणाच्या तरतुदीसाठी इतिहासात त्यांची ओळख आहे.
पुनर्विवाहाला महाराजांनी कायदेशीर मान्यता दिली. त्यांना समाजातील कोणत्याही गटाशी वैर वाटत नव्हते. साहू महाराजांना शोषितांबद्दल घट्ट आत्मीयता आहे. समाजसुधारणेच्या दिशेने त्यांनी केलेले क्रांतिकारी कार्य दीर्घकाळ स्मरणात राहील.
मृत्यू : Shahu Maharaj Death
6 मे 1922 रोजी शाहू महाराज यांचे मुंबईतील पन्हाळा लॉज या निवासस्थानी निधन झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्यावर कोल्हापुरात अंत्यसंस्कार करण्यात आले.
FAQs
राजर्षी शाहू महाराज मूळ नाव काय? (Shahu Maharaj original name in marathi)
राजर्षी शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते.
शाहू महाराजांनी कोणासाठी कार्य केले?
शाळा, दवाखाने, पाणवठे, सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक इमारती इत्यादी ठिकाणी (तत्कालीन) अस्पृश्यांना समानतेने वागवावे असा आदेश त्यांनी कोल्हापूर संस्थानात काढला. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. तसेच त्यांनी देवदासी प्रथा बंद करण्यासाठीही कायद्याची निर्मिती केली.
छत्रपती शाहू महाराज कोण होते? (Shahu maharaj in marathi)
राजर्षी शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू व चौथे शाहू नावांनी प्रसिद्ध, हे मराठ्यांच्या भोसले घराण्यातील कोल्हापूर संस्थानाचे राजे (राज्यकाळ १८९४ – १९००) आणि पहिले छत्रपती (१९००-१९२२) होते
कोल्हापूर संस्थानात मागास जातींना किती टक्के जागा राखीव राहतील अशी त्यांनी घोषणा केली?
६ जुलै १९०२ रोजी कोल्हापूर संस्थानात मागास जातींना ५० टक्के जागा राखीव राहतील अशी घोषणा केली व तिची त्वरित अंमलबजावणी करून संबंधत अधिकाऱ्याकडून अहवाल मागविले.
मित्रानो तुम्हाला आमचा हा शाहू महाराजांचा (Shahu Maharaj information in marathi) लेख कसा आवडला हे आम्हाला नक्की कळवा, आणि हो आमचे हे दोन उत्तम लेख (Mazi Aai Nibandh in Marathi) & (Sant Kabir Information in Marathi) वाचायला विसरू नका…